March 12, 2025 7:11 PM

views 16

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या मानापमानावरून होनारे वाद मिटवण्यात पोलिसांना यश

रत्नागिरी जिल्ह्यातल्या २४ गावांमध्ये शिमगोत्सवाच्या मानापमानावरून काही वाद होत होते, मात्र पोलिसांनी पुढाकार घेतल्याने २४ पैकी १९ गावांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आलं आहे.   अन्य गावांमध्येही वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

February 20, 2025 7:48 PM

views 12

रत्नागिरीत महिला प्रभाग संघाच्या हाऊसबोटचं लोकार्पण

रत्नागिरी तालुक्यातल्या राई बंदरात महिला प्रभाग संघातर्फे चालवल्या जाणाऱ्या देशातल्या पहिल्या हाऊसबोटचं लोकार्पण आज झालं. उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. कोतवडे इथल्या एकता महिला प्रभाग संघातर्फे चालवली जाणार आहे. महिलांनी हाऊसबोट चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं, असं उदय सामंत यावेळी म्हणाले. या हाऊसबोटीमधे पर्यटकांसाठी अत्याधुनिक स्वरुपाचे दोन शयनकक्ष, डेक अशी सुविधा आहे. तसंच स्थानिक खाद्यसंस्कृती, लोककलांचा आस्वादही या बोटीवर घेता येणार आहे.

February 20, 2025 8:49 PM

views 46

काजूला हमीभाव मिळण्यासाठी रत्नागिरीत लाक्षणिक उपोषण

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या काजु उत्पादक जिल्ह्यांमध्ये काजूला हमीभाव मिळावा या मागणीसाठी रत्नागिरी तालुक्यात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे.   गोळप इथले शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करत आहेत. गावठी काजू बियांना १६० रुपये, तर वेंगुर्ला जातीच्या काजू बियांना १८० रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी काळे यांनी केली आहे.

January 12, 2025 7:32 PM

views 28

रत्नागिरीत आयोजित तिसऱ्या सागर महोत्सवाचा समारोप

रत्नागिरी इथं आयोजित  तिसऱ्या सागर महोत्सवाचा आज  समारोप झाला. आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशननं आयोजित केलेल्या या महोत्सवात अध्यात्म, विज्ञान, जैवविविधता, परिसंस्था, जलदुर्ग, प्रदूषण अशा विविध अंगांनी सागराचं महत्त्व उलगडणारी तज्ज्ञांची व्याख्यानं, प्रात्यक्षिकं आणि अभ्यासफेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या. `

January 3, 2025 3:22 PM

views 24

रत्नागिरीत चाचा नेहरू बालमहोत्सवाचं आयोजन

रत्नागिरीत चाचा नेहरू बालमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाने रत्नागिरी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या बालमहोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. येत्या पाच जानेवारीपर्यंत हा बालमहोत्सव सुरु राहणार असून या महोत्सवात ५०० मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. क्रिकेट, खो-खो, कबड्डी अशा क्रीडाप्रकारांबरोबरच निबंध, चित्रकला, सामूहिक गायन, नाटिका अशा सांस्कृतिक स्पर्धाही होणार आहेत. जिल्ह्यात बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये प...

January 2, 2025 7:33 PM

views 13

रत्नागिरीत ‘किन्नर अस्मिता’ या तृतीयपंथीयांच्या पहिल्या स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापन

रत्नागिरी जिल्ह्यात किन्नर अस्मिता हा तृतीयपंथीयांचा पहिला स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केला आहे. तृतीयपंथीयांना समाजाबरोबर जाता यावं, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी या गटाला सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.

December 18, 2024 6:57 PM

views 13

रत्नागिरीत वायुगळतीमुळं बाधित विद्यार्थ्यांच्या पालकांचं रास्ता रोको आंदोलन

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या  वायुगळतीमुळं बाधित  विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज जयगडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. पालकांनी जयगड सागरी पोलीस ठाण्यात जाऊन जिंदाल कंपनीबद्दल रोष व्यक्त केला, तसंच कायमस्वरूपी ठोस उपाययोजनांची मागणी केली. संतप्त  पालकांनी कंपनीच्या गाड्या रोखल्या, तसंच प्रवेशद्वारही बंद केलं. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात‌ राहण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. ही दुर्घटना १२ डिसेंबरला झाली. त्यानंतर  सुमारे ७० विद्यार्थ्यांना उपचारांसाठ...

December 17, 2024 8:58 AM

views 8

रत्नागिरीत वायुगळतीमुळे बाधित विद्यार्थ्यी पुन्हा रुग्णालयात दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थ्यांना काल पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांनंतर त्यांना शासकीय रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं; मात्र काल त्यांना परत त्रास जाणवू लागल्याने पुन्हा उपचारांसाठी आणण्यात आलं आहे.

December 15, 2024 3:07 PM

views 31

रत्नागिरीत जयगडमधल्या वायुगळतीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळतीच्या प्रकरणात जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड कंपनीच्या चौघांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायुगळतीचं कारण शोधण्यासाठी मुंबई किंवा पुण्यातून तज्ज्ञांना बोलावलं जाणार आहे. दरम्यान, आणखी ३३ मुलांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून, सात मुलांवर उपचार सुरू आहेत. 'गॅस वाहतूक बंद होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याची भूमिका पालकांनी घेतली असून, उद्यापर्यंत गॅस वाहतूक करणारे ट्रक तिथून हलवावेत, अन्यथा बुधवारी आंदोलन केलं जाईल,' असा इशार...

December 13, 2024 7:28 PM

views 8

रत्नागिरीत वायुगळतीप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना

रत्नागिरी जिल्ह्यात जयगड इथं झालेल्या वायुगळतीप्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल हाती आल्यावर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. त्यांनी आज रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची भेट घेतली.