October 11, 2024 10:00 AM October 11, 2024 10:00 AM

views 17

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांना काल भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबईत वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी काल सकाळी टाटा यांचं पार्थिव शरीर एन सी पी ए इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.   उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद ...

October 10, 2024 2:20 PM October 10, 2024 2:20 PM

views 8

देशविदेशातल्या मान्यवरांकडून रतन टाटा यांना आदरांजली अर्पण

मुंबईत NCPA मध्ये विविध क्षेत्रातले मान्यवर, उद्योगपती, टाटा समूहाच्या विविध कंपन्यांचे कर्मचारी, राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आले आहेत. टाटा यांचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत एनसीपीए मध्ये ठेवण्यात येणार आहे. वरळीतल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. मुख्य...