January 11, 2026 1:22 PM

views 12

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक होणार

रशियाने यूक्रेनवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक उद्या होणार आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी ही माहिती दिली. या हल्ल्यांमध्ये मध्यम-पल्ल्याच्या मारक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. हे हल्ले त्वरित थांबवावेत, तसंच यूक्रेनमधील नागरिकांचं संरक्षण, युक्रेनचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी पाठिंबा देण्याचं आवाहन आंद्री सिबिहा यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला केलं. तर दोन्ही देशांमधे तण...

November 23, 2025 7:47 PM

views 26

रशिया – युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने तयार केलेल्या शांतता योजनेच्या मसुद्यावर जिनिव्हा इथे चर्चा

रशिया - युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने तयार केलेल्या शांतता योजनेच्या मसुद्यावर आज अमेरिका आणि युक्रेनचे उच्चाधिकारी तसंच फ्रांस, ब्रिटन आणि जर्मनीचे सुरक्षा सल्लागार जिनिव्हा इथे चर्चा करणार आहेत. अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यावेळी उपस्थित असतील. याविषयी आपण युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी नंतर चर्चा करणार असल्याचं कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या शांतता योजनेत रशियाच्याच मागण्या पुढे केल्या असून युक्रे...

November 15, 2025 7:41 PM

views 19

युक्रेनचा रशियाच्या नोव्होरोसियस्क बंदरातल्या महत्वाच्या तेल टर्मिनलवर हल्ला

  युक्रेननं काल रात्री रशियाच्या नोव्होरोसियस्क या बंदरातल्या महत्वाच्या तेल टर्मिनलवर हल्ला केला. त्यामुळे लागलेल्या आगीत पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं. रशियाच्या सर्वात मोठ्या तेल निर्यात सुविधांपैकी एक असलेल्या या टर्मिनलवर युक्रेनियन सैन्यानं हल्ला केल्याच्या वृत्ताला  दोन्ही देशांनी दुजोरा दिला आहे. युक्रेनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत, रशियानं काल रात्री युक्रेनचे २१६ ड्रोन नष्ट केल्याचं रशियन गव्हर्नर वेनियामिन कोंड्राटिव्ह यांनी सांगितलं.