October 31, 2024 1:59 PM October 31, 2024 1:59 PM
4
आगामी २५ वर्षांत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्त्वाची – प्रधानमंत्री
पुढच्या २५ वर्षांत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्त्वाची असून फुटीरतावादी शक्तीपासून सावधान राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने गुजरातमधल्या केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. सरकार मागच्या दहा वर्षांपासून एक राष्ट्र या भावनेला बळकट करत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. देशासमोर अनेक आव्हानं असून यापासून देशाची एकता आणि सुरक्षा याला धोका निर्माण होत आहे असं सांगत ना...