September 7, 2024 3:23 PM September 7, 2024 3:23 PM

views 3

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमातंर्गत आतापर्यंत १ कोटी ३७ लाख उपक्रम

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमातंर्गत आतापर्यंत १ कोटी ३७ लाख उपक्रम राबवण्यात आले आहेत. १ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या राष्ट्रीय पोषण महाची सुरुवात गुजरातमधून झाली होती. या कार्यक्रमातंर्गत रक्ताची कमतरता, वाढ नियंत्रण, मोफत आहार, पोषण भी पढाई भी हे उपक्रम नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं राबवण्यात आले. याच कार्यक्रमामध्ये एक पेड मा के नाम या उपक्रमाचाही समावेश करण्यात आला असून देशातल्या १३ कोटी ९५ लाख अंगणवाड्याच्या परिसरात हे वृक्ष लावण्यात आले आहेत.