November 26, 2024 2:38 PM November 26, 2024 2:38 PM

views 48

राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती

राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शुक्ला यांच्या जागी संजयकुमार वर्मा यांची नेमणूक झाली होती. आणि शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. शुक्ला यांना पदावरुन हटवण्याची मागणी काँग्रेसने केली होती. आता निवडणूक प्रक्रीया संपल्यानंतर शुक्ला यांना पुन्हा नियुक्त करण्याचा आदेश गृहमंत्रालयानं काल काढला आहे.

November 4, 2024 7:39 PM November 4, 2024 7:39 PM

views 14

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर आयोगानं ही कारवाई केली आहे. पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवला आहे. नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.   निवडणूक आयोगाच्या या आदेशाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. पण रश्मी शुक्ला यांना हटवण्या...

September 27, 2024 7:19 PM September 27, 2024 7:19 PM

views 13

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन तात्काळ हटवण्याची काँग्रेसची मागणी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन तात्काळ  हटवावं अशी विनंती प्रदेश काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. रश्मी शुक्ला यांची सेवानिवृत्ती ३० जून २०२४ ला होणार असताना त्यांना बेकायदेशीररित्या जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, विरोधी पक्षनेत्यांचे दूरध्वनी बेकायदेशीररित्या टॅप करण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत, त्यांची कार्यक्षमता आणि निःपक्षपातीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, या पार्श्वभूमीवर राज्यात विधानसभेच्या आगामी निवडणुका मुक्त वातावरणात पार पडण्याच्...