September 10, 2024 8:20 PM September 10, 2024 8:20 PM
14
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती स्थापन
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. त्यात तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख, विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश असल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार केल्याचं ते म्हणाले. जाहीरनामा समितीचं प्रमुखपद सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देण्यात आलं असून प्रचार यंत्रणा रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली असेल. महायुती निवडण...