January 26, 2025 7:13 PM January 26, 2025 7:13 PM

views 11

रणजी करंडक : महाराष्ट्राचा बडोद्यावर ४३९ धावांनी दणदणीत विजय

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नाशिक इथं झालेल्या सामन्यात आज महाराष्ट्रानं बडोद्यावर ४३९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्रानं पहिल्या डावात, २९७ धावा केल्या होत्या, तर बडोद्यानं १४५ धावा केल्या. दुसऱ्या डावात ७ बाद ४६४ धावांवर महाराष्ट्रानं आज आपला डाव घोषित केला. सौरभ नवलेनं नाबाद १२६ धावा केल्या. रामकृष्ण घोषचं शतक थोडक्यात हुकलं. त्यानं ९९ धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडनं ८९ धावांचं योगदान दिलं.     महाराष्ट्राच्या पहिल्या डावातल्या आघाडीमुळे बडोद्यापुढं विजयासाठी ६१६ धावांचं आव...