February 26, 2025 3:21 PM February 26, 2025 3:21 PM

views 17

Ranji Trophy Final : विदर्भ आणि केरळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातल्या अंतिम सामन्याला आज नागपूरमधे सुरुवात झाली. केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या सत्राच्या खेळात केरळनं अवघ्या २४ धावांमध्येच विदर्भाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले. मात्र त्यानंतर चौथ्या गड्यासाठी दानिश मालेवार यानं झुंझार शतकी खेळीसह करूण नायर याच्यासोबत दीड शतकी भागिदारी करत विदर्भाचा डाव सावरला. केरळच्या निधीश यानं विदर्भाचे दोन गडी बाद केले.   शेवटचं वृत्त हाती आलं तेव्ह...

February 19, 2025 8:34 PM February 19, 2025 8:34 PM

views 15

Ranji Trophy Cricket: विदर्भाची मुंबईवर २६० धावांची आघाडी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नागपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं दुसऱ्या डावात आज दिवसअखेर ४ बाद १४७ धावा करत, मुंबईवर २६० धावांची आघाडी घेतली.    मुंबईचा पहिला डाव आज २७० धावांवर आटोपला. आकाश आनंदनं शतक झळकावत १०६ धावा केल्या. विदर्भातर्फे पार्थ रेखाडेनं ४ बळी घेतले. दुसऱ्या डावात, विदर्भाची सुरुवात खराब झाली. त्यांचे ४ गडी झटपट बाद झाले. मात्र त्यानंतर यश राठोड आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी डाव सावरला. आजचा खेळ थांबला तेव्हा यश राठोड ५९, तर अक्षय वाडकर ३१ धावांवर ख...

February 18, 2025 3:37 PM February 18, 2025 3:37 PM

views 15

रणजी करंडक : मुंबई विरुद्धच्या उपान्त्य सामन्यात विदर्भाचा पहिल्या डावात ३८३ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नागपूरमधे सुरू असलेल्या उपान्त्य सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात मुंबईसमोर ३८३ धावांचा डोंगर उभारला आहे. काल नाणेफेक जिंकून विदर्भाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसअखेर त्यांच्या ५ बाद ३०८ धावा झाल्या होत्या. मुंबईचा डाव सुरु झाला असून चहापानापर्यंत  त्यांच्या २ गडी बाद ८५ धावा झाल्या होत्या.     अहमदाबाद मधे दुसरा उपांत्य सामना केरळ आणि गुजरात दरम्यान सुरू असून, केरळनं काल पहिल्या दिवसअखेर ४ बाद २०६ धावा केल्या. आज दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त मिळालं ...

January 31, 2025 8:21 PM January 31, 2025 8:21 PM

views 19

रणजी करंडक : मेघालयविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या ७ बाद ६७१ धावा

मुंबईत सुरु असलेल्या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारत मेघालयाची दाणादाण उडवली. मेघालयाचा पहिला डाव काल पहिल्या दिवशी ८६ धावांवर संपल्यानंतर मुंबईनं आज ७ बाद ६७१ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. सिद्धेश लाडनं १४५, आकाश आनंदनं १०३, शम्स मुलानीनं नाबाद १०० धावा केल्या. मेघालयानं आज दिवसअखेर दोन गडी गमावून २७ धावा केल्या.   रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सोलापूर इथं सुरु असलेल्या, सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्र त्रिपुरापेक्षा ३५ धावांनी पिछाडीवर राहिला. त्रिपुरानं पहिल...

January 22, 2025 7:51 PM January 22, 2025 7:51 PM

views 2

रणजी ट्रॉफी : नाशिकमध्ये उद्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या संघादरम्यान सामना

नाशिकमध्ये उद्यापासून महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या दोन संघांदरम्यान रणजी ट्रॉफी क्रिकेट सामन्याला सुरुवात होत आहे. नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर प्रथमच हा सामना होत आहे. २०१८ नंतर प्रथमच नाशिकमध्ये रणजीचा सामना होत असून तो २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत असून बडोद्यााचा संघ  कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.