January 24, 2026 7:52 PM
रणजी करंडकात हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात, सर्फराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ड गटात इथं सुरु असलेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशी, सर्फराज खानच्या द्विशतकी खेळीच्या बळावर मुंबईनं आपली बाजू भक्कम केली. कालच्या ४ बाद ३३२ धावांवरुन आज पुढचा खेळ सुरु झाल्यावर सर्फराज खाननं द्विशतक पूर्ण केलं. २२९ चेंडूत २२७ धावा करताना त्यानं १९ चौकार आणि ९ षटकार ठोकले. सुवेद पारकरनं ७५, तर अथर्व अंकोलेकरनं नाबाद ३५ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला पहिल्या डावात ५६० धावांचा डोंगर उभा करता आला. हैदराबादच्या पहिल्या डावात त्यांचे...