February 11, 2025 8:33 PM February 11, 2025 8:33 PM

views 4

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ उपांत्य फेरीत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कोलकाता इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात, मुंबईनं आज हरयाणावर १५२ धावांनी विजय मिळवला. मुंबईनं पहिल्या डावात ३१५, तर दुसऱ्या डावात ३३९ धावा केल्या. दुसऱ्या डावात आज कर्णधार अजिंक्य रहाणेनं १०८ धावा केल्या. हरयाणानं पहिल्या डावात ३०१ धावा केल्या होत्या. मात्र त्यांचा दुसरा डाव २०१ धावात आटोपला.   नागपुरात झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात, विदर्भानं तामीळनाडूवर १९८ धावांनी मात केली. विदर्भानं पहिल्या डावात ...

February 10, 2025 7:50 PM February 10, 2025 7:50 PM

views 3

रणजी करंडक : मुंबईची हरयाणावर २९२ धावांची आघाडी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत कोलकाता इथं सुरु असलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात, मुंबईनं आज तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात हरयाणावर २९२ धावांची आघाडी घेतली.    मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३१५ धावा केल्या होत्या. तनुष कोटियनच्या ९७, आणि शम्स मुलानीच्या ९१ धावांचा त्यात मोलाचा वाटा होता. हरयाणाचा पहिला डाव आज ३०१ धावांवर संपला. कर्णधार अंकित कुमारनं १३६ धावा केल्या. या डावात मुंबईतर्फे शार्द्रुल ठाकूरनं ६ गडी बाद केले.    मुंबईनं दुसऱ्या डावात आज दिवसअखेर ४ बाद २७८ धावा केल्या...