September 15, 2025 7:01 PM September 15, 2025 7:01 PM

views 14

रामटेक इथं उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या ६० दिवसात जमीन हस्तांतरित

विदर्भात चित्रपट निर्मिती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी रामटेक इथं उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या ६० दिवसात जमीन हस्तांतरित करण्याचा आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिली. ते रामटेक जवळच्या नवरगाव इथल्या प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी केल्यानंतर बोलत होते. रामटेकच्या प्राचीन गड मंदिर परिसरात भाविकांसाठी अद्ययावत सोयी सुविधा उभारण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंह...