September 14, 2024 1:54 PM September 14, 2024 1:54 PM
3
भारत जगातला सर्वात मोठा, अन्नावर आधारित सुरक्षा महाजाल कार्यक्रम राबवत आहे- रामनाथ ठाकूर
अन्न सुरक्षा आणि पोषणाची सुनिश्चिती करण्याच्या दृष्टीनं भारत जगातला सर्वात मोठा, अन्नावर आधारित सुरक्षा महाजाल कार्यक्रम राबवत आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केलं. ते ब्राझीलमध्ये जी - २० कृषीमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं शेती विकासाला प्राधान्य दिलं असून निव्वळ उत्पादकतेवर भर देण्याचं भारताचं धोरण नाही तर आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय शाश्वतता, शेतकऱ्यांची भरभराट असा भारताचा सर्वसमावेशक...