November 15, 2025 7:05 PM November 15, 2025 7:05 PM
17
निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपेल ही टीका निरर्थक-रमेश चेन्निथला
निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपेल ही टीका निरर्थक असून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि ताकदीनं उभा राहील असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला. मुंबईत आज काँग्रेसचं एकदिवसीय शिबीर झालं त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेस ही एक विचारधारा आहे, काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे काँग्रेस कधीच संपत नाही असं चेन्निथला म्हणाले. निवडणुकीत हार-जीत होतच असते, पण सत्ता नाही म्हणून थांबून चालणार नाही. नकारात्मकता सोडून लढाऊ बाणा अंगी बाळगा, असं आवा...