July 30, 2024 8:37 PM July 30, 2024 8:37 PM

views 19

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना निरोप

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज निरोप देण्यात आला. राजभवनात झालेल्या या निरोप सभारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, तसंच राजभवनातले अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.       नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता राजभवनात होणार आहे.