March 25, 2025 7:23 PM March 25, 2025 7:23 PM

views 13

अहिल्यानगरचे सुपुत्र हवालदार रामदास बढे कर्तव्य बजावताना शहीद

अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपूत्र हवालदार रामदास साहेबराव बढे आज जम्मू आणि काश्मीरमधील तंगधर जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांच्या पार्थीवावर उद्या २६ मार्च २०२५ रोजी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संगमनेर तालुक्यातल्या मेंढवण या त्यांच्या मूळ गावी उद्या दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. यावेळी लष्करातले जवान आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.   हवालदार रामदास बढे हे लष्कराच्या युनिट ३४ अंतर्गत फिल्ड रेजीमेंट मध्ये कार्यरत होते. २४ मार्च २०२५ रोजी नियंत्रण...