November 30, 2024 3:21 PM November 30, 2024 3:21 PM

views 7

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल‌ – मंत्री रामदास आठवले

येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल‌, त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचं पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. ते आज उत्तरप्रदेशात लखनौ इथं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. सर्व जाती धर्मियांपर्यंत रिपब्लिकन पक्ष पोहचवावा, असं आवाहन आठवले यांनी यावेळी केलं.

October 21, 2024 7:47 PM October 21, 2024 7:47 PM

views 9

रामदास आठवले यांच्याकडून महायुतीकडे ५-६ जागांची मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडे पाच ते सहा जागांची मागणी केल्याचं रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वार्ताहरांना सांगितलं. आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाली. रिपब्लिकन पक्षाला जागा सोडणं आवश्यक असून महायुतीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल, असं फडनवीस म्हणाल्याचं आठवले यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत चर्चा झाल्याचं ...

September 22, 2024 7:22 PM September 22, 2024 7:22 PM

views 26

महायुतीत रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीतल्या तीन प्रमुख पक्षांनी प्रत्येकी चार जागा रिपाईला द्याव्यात, असं ते म्हणाले.   विदर्भातल्या उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम या मतदारसंघांसाठी आठवले आग्रही आहेत. राज्यात लढवणार असलेल्या एकूण जागांची यादी दोन दिवसांत आपण महायुतीला देऊ, या सर्व जागा आमच्याच चिन्हावर लढवू, असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.

September 22, 2024 3:41 PM September 22, 2024 3:41 PM

views 3

मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंत्री रामदास आठवले यांची प्रशंसा

दलित चळवळीचं रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशंसा केली आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार मंत्री रामदास आठवले यांना आज नागपूरमध्ये गडकरी यांच्या हस्ते प्रदान केला गेला, त्यावेळी ते बोलत होते.   मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. बौद्ध समाजात अनेक गट आहेत, त्यामुळे आपली ताकद वा...

September 13, 2024 8:38 PM September 13, 2024 8:38 PM

views 16

राहुल गांधी यांच्या पक्षाचे ९९ खासदार कसे निवडून आले ? – राज्यमंत्री रामदास आठवले

देशात लोकशाही नाही असं मानणाऱ्या राहूल गांधी यांच्या पक्षाचे 99 खासदार कसे निवडून आले, असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते आज धर्मशाला इथं दौऱ्यावर असताना बातमीदारांशी बोलत होते. राहुल गांधी  लोकशाहीमुळेच ते विरोधी पक्षनेता बनू शकले आहेत, असा दावा त्यांनी केला. हिमाचल प्रदेश मधल्या मंडी इथं मशिदी वरून झालेल्या वादावर ते म्हणाले की, संविधानाच्या अंतर्गत कायदेशीर मार्गानं तो़डगा काढावा.