January 18, 2026 7:31 PM
12
ज्येष्ठ इतिहाससंशोधक रामचंद्र मोरवंचीकर यांचं निधन
ज्येष्ठ इतिहाससंशोधक रामचंद्र मोरवंचीकर यांचं छत्रपती संभाजी नगर इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पहिलं तसंच पर्यटन विभागाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. ‘प्रतिष्ठान ते पैठण’ हा त्यांचा ग्रंथ सातवाहन काळाच्या अभ्यासाकरता महत्वाचा स्रोत ठरला. १६ पुस्तकं आणि २०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध त्यांनी लिहिले. प्रतापनगर स्मशानभूमी इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.