March 16, 2025 2:06 PM March 16, 2025 2:06 PM
7
ओडिया साहित्यिक रमाकांत रथ यांचं निधन
विख्यात ओडिया साहित्यिक रमाकांत रथ यांचं आज सकाळी भुवनेश्वर इथे वार्धक्क्यानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. ओडिया साहित्यातले आधुनिकतावादी कवी अशी ओळख असणाऱ्या रथ यांना २००६ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. १९५७ सालच्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी असणारे रथ यांनी ओडिशाच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारीही सांभाळली होती.