February 20, 2025 1:06 PM February 20, 2025 1:06 PM

views 5

ईपीएल प्रणालीचं के. राममोहन नायडू यांच्या हस्ते उद्धघाटन

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी आज देशातील वैमानिकांसाठीच्या इलेक्ट्रॉनिक व्यक्तीगत परवाना म्हणजेच ईपीएल प्रणालीचं उद्धघाटन केलं.    या नव्या परवाना पद्धतीमुळे वैमानिकांना परवाना मिळवणं आणि त्याचं नुुतनीकरण करणं अधिक सुलभ होणार आहे. इलेक्ट्रॉनिक लायसन्स देणारा भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे, असंही नायडू यांनी यावेळी सांगितलं.