November 25, 2025 7:34 PM November 25, 2025 7:34 PM
42
अयोध्येतल्या श्रीराममंदिरात धर्मध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अयोध्येमधल्या राम मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं. राममंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हे ध्वजारोहण करण्यात आलं आहे. विवाह पंचमीच्या मुहुर्तावर होत असलेल्या धर्मध्वज सोहळ्यानिमित्त देशभरातून हजारो भाविक अयोध्यानगरीत जमले असून सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष आणि शंखध्वनी ऐकू येत आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अयोध्येत रोड शो केला आणि राम मंदिर परिसरातल्या विविध मंदिरांना भेट देऊन तिथे पूजा केली. प्रधानमंत्र्यानी सप्तमंदिर,...