August 9, 2025 10:58 AM August 9, 2025 10:58 AM

views 3

देशभरात सर्वत्र रक्षाबंधन सणाचा उत्साह

संपूर्ण देशभर आज राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा बहिण-भावांमधील खास नात्याचा सण साजरा करण्यात येत आहे. या दिवशी बहिणी भावांना राखी बांधून त्यांच्या भरभराटीची, उत्तम आरोग्याची आणि सुखी आयुष्याची सदिच्छा व्यक्त करतात, तर भाऊ बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचं रक्षण करण्याचं वचन देतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समस्त देशवासीयांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. समाजात सलोखा आणि एकतेची भावना वाढण्यास चालना देणारा हा सण असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा सं...