August 20, 2024 9:45 AM August 20, 2024 9:45 AM
10
देशातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपतींनी साजरा केला राखीपौर्णिमेचा सण
देशभरातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी काल राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. 16 राज्यांमध्ये विविध सरकारी शाळांमधल्या 180 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. या विद्यार्थ्यांना अमृत उद्यानाची सफर घडवून आणल्याची माहितीही मंत्रालयाने दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आशीर्वाद दिल्याबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रपती मूर्मू यांचे आभार मानले.