August 9, 2024 8:20 PM August 9, 2024 8:20 PM

views 9

वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत मंजूर झाला. या समितीत लोकसभेतले २१ तर राज्यसभेतले १० खासदार आहेत. लोकसभेतले जदंबिका पाल, निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्य, दिलीप साईकिया, गौरव गोगोई, नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे, अरविंद सावंत, इम्रान मसूद, मोहम्मद जावेद, असदउद्दीन ओवैसी, कल्याण बॅनर्जी या सदस्यांचा समावेश आहे. ही समिती संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी अहवाल सादर करील असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू य...

August 9, 2024 8:07 PM August 9, 2024 8:07 PM

views 17

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित

संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज निर्धारित वेळेआधी दोन दिवस संस्थगित करण्यात आलं. गेल्या महिन्यात २२ तारखेला सुरु झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत चालणार होतं. लोकसभेत या अधिवेशन काळात १५ बैठका झाल्या, ११५ तास कामकाज झालं, अशी माहिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर २७ तास १९ मिनिटं चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. या अधिवेशन काळात लोकसभेत नवीन १२ विधेयकं मांडण्यात आली, त्यापैकी वित्त विधेयक, विनियोजन ...

August 6, 2024 8:05 PM August 6, 2024 8:05 PM

views 12

प्रधानमंत्री जनधन बँक खातं तसंच बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट

प्रधानमंत्री जनधन बँक खातं तसंच बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. खात्यात किमान रक्कम शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांकडून बँकेनं दंड वसूल केल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.  राज्यसभेत आजही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा सुरु राहिली. सरकारनं अनेक कोटी कुटुंबाना एलईडी बल्ब पुरवल्यामुळे ४ हजार ५०० कोटी युनिट विजेची बचत झाल्याचं भाजपाचे खासदार अमर पाल मौर्य यांन...

August 1, 2024 7:16 PM August 1, 2024 7:16 PM

views 10

हिंदकेसरी ठरलेल्या कुस्तीगीरांना राज्य सरकारचं अनुदान मिळालेलं नाही – खासदार रजनी पाटील

हिंदकेसरी ठरलेल्या कुस्तीगीरांना राज्य सरकारचं अनुदान गेल्या ११ वर्षांपासून मिळालेलं नाही, हा मुद्दा राज्यसभेत खासदार रजनी पाटील यांनी उपस्थित केला. खेळाडूंचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावं, यादृष्टीनं विशेष नियामक मंडळ स्थापन करावं, अशी मागणी रजनी पाटील यांनी केली.   देशात निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट २५ वर्षांवरून २१ वर्ष करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी केली आहे. शून्यकाळात बोलतांना चढ्ढा यांनी, तरुणांनी सक्रीय राजकारणात येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार...

June 29, 2024 9:39 AM June 29, 2024 9:39 AM

views 18

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत चर्चा सुरू

राज्यसभेत विरोधकांनी नीट परीक्षा गैरप्रकार प्रकरणी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त सत्राला उद्देशून केलेल्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. या चर्चेसाठी 21 तास राखून ठेवण्यात आले आहेत. कालच्या चर्चेदरम्यान भारतीय जनता पार्टीनं कॉंग्रेसवर टीका केली. कॉंग्रेस पक्ष सत्तेवर असतो, तेव्हा तेव्हा राज्यघटना धोक्यात असते असा आरोप करण्यात आला. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत बदलांसह अनेक उदाहरणं देण्यात आली.   दरम्यान, लोकसभेत विरोधक नीट मुद्द्यावर चर...

June 28, 2024 1:42 PM June 28, 2024 1:42 PM

views 10

वैद्यकीय प्रवेश परीक्षा – नीट मधल्या गैरप्रकारांविषयी लोकसभेत विरोधी पक्षसदस्यांचा गदारोळ

वैद्यकीय प्रवेश परीक्षा - नीट मधल्या गैरप्रकारांविषयी चर्चेची मागणी करत विरोधी पक्षसदस्यांनी गदारोळ केल्यामुळे, आज लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर आज चर्चा होणार होती. मात्र लोकसभेत आजच्या दिवसाचं कामकाज सुरु होताच वैद्यकीय प्रवेश परीक्षा-नीट प्रकरणी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी ती अमान्य केल्यानं विरोधकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे स...

June 13, 2024 9:10 PM June 13, 2024 9:10 PM

views 83

राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून येण्याचा सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा

राज्यसभा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडून येण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याशिवाय इतर कुणीही अर्ज भरलेला नाही. उद्या अर्जाची छाननी होईल, त्यानंतर त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होऊ शकते.  प्रफुल्ल पटेल यांनी कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बुधवारी रात्री त्यांच्या नावावर सहमती झाली, त्यांच्या उमेदवारीव...