December 18, 2024 3:32 PM December 18, 2024 3:32 PM
14
दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरुन गदारोळ झाल्याने आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी आज प्रचंड गदारोळ केला. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर लगेचच काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी शहा यांचा निषेध करणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केली. ...