December 18, 2025 6:54 PM December 18, 2025 6:54 PM

views 7

राज्यसभेत ‘अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक, २०२५’ वर चर्चा

राज्यसभेत आज ‘अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक, २०२५’ वर चर्चा सुरु झाली. लोकसभेत काल हे विधेयक मंजूर झालं होतं. अणु ऊर्जेचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी अणुऊर्जा निर्मितीमध्ये किरणोत्साराचं आयनीकरण, तसंच अणुऊर्जेच्या सुरक्षित वापरासाठी मजबूत नियामक चौकट निर्माण करणं, हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे.      ‘कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि पक्षाघात प्रतिबंध आणि नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम’ हा केंद्रसरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, या अंतर्गत देशभरातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्य...

December 12, 2025 1:19 PM December 12, 2025 1:19 PM

views 16

Rajyasabha: देशाच्या कृषी उत्पादनात ४४ टक्के वाढ

गेल्या दहा वर्षांत देशाच्या कृषी उत्पादनात ४४ टक्के वाढ झाली असून, हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यांनी ही माहिती दिली.   बियाण्याचं नवं वाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीच्या सुधारित पद्धतींचा वापर यामुळे हे शक्य झाल्याचं ते यावेळी म्हणाले. कृषी क्षेत्राचा व्यापक विस्तार करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

December 1, 2025 7:48 PM December 1, 2025 7:48 PM

views 5

राज्यसभेत कामकाज उद्यापर्यंत तहकूब

राज्यसभेत आज ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. नॅशनल कॉन्फरन्सचे गुरविंदर सिंग ओबेरॉय, चौधरी मोहम्मद रमजान आणि सज्जाद अहमद किचलू यांनी वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदाच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणारे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यावेळी म्हणाले.   राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राधाकृष्णन हे निःपक्षपातीपणे वागणूक देतील, अशी आ...

August 21, 2025 3:05 PM August 21, 2025 3:05 PM

views 19

संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. २१ जुलैला हे अधिवेशन सुरु झालं होतं. आज सकाळी ११ वाजता लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, बिहार मतदारयाद्या पुनरीक्षणावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यामुळे गोंधळ सुरु झाला. त्यामुळे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं. १२ वाजता कामकाज सुुरु झाल्यावरही गोंधळ सुरुच राहिल्यानं अखेर लोकसभेचं कामकाज पुढच्या अधिवेशनापर्यंत संस्थगित करत असल्याचं सभापतींनी जाहीर केलं.    या अधिवेशनात लोक...

August 20, 2025 1:00 PM August 20, 2025 1:00 PM

views 3

राज्यसभेचं कामकाज दुपारी २ वाजपर्यंत तहकूब

राज्यसभेतही काहीस समान चित्र पहायला मिळालं. विविध राजकीय पक्षांकडून १८ स्थगन प्रस्ताव मिळाले असून हे प्रस्ताव फेटाळले असल्याचं,  उपसभापती हरिवंश यांनी सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. उपसभापतींनी शून्य प्रहर पुकारला, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी राज्यसभेचं कामकाज प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब केलं.

August 4, 2025 1:23 PM August 4, 2025 1:23 PM

views 3

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्यसभेचं कामकाज आज सकाळी सुरु झाल्यावर दिवंगत नेते शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, आणि त्यानंतर सदनाचं कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेतही दिवंगत नेते शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

August 1, 2025 1:16 PM August 1, 2025 1:16 PM

views 12

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्यसभेतही विरोधकांनी विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी केली. आपल्याकडे ३० स्थगन प्रस्ताव आले असून ते फेटाळत असल्याचं उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं. बिहारमधल्या मतदार याद्या पुनरिक्षणावर चर्चा घेता येणार नाही कारण निवडणूक आयोग संवैधानक संस्था आहे आणि हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे असं हरिवंश यांनी स्पष्ट केलं. मात्र विरोधकांच्या घोषणा चालूच राहील्यानं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

July 22, 2025 1:17 PM July 22, 2025 1:17 PM

views 15

दोन्ही सभागृहांचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.   लोकसभेत सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरु केल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरिक्षण या विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे महत्त्वाचे प्रश्न पटलावर असल्यानं शांतपणे कामकाज चालू द्यावं, असं सभापती बिरला यांनी सदस्यांना सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसि...

April 4, 2025 1:26 PM April 4, 2025 1:26 PM

views 9

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. ३१ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात ११८ टक्के काम झालं असून १६ विधेयकं पारित  झाल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं.    वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत १४ तास तर  राज्यसभेत १७ तास चर्चा झाल्याचं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं.  हे विधेयक सरकारने बळजबरीने पारीत करून घेतल्याचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी  यांचा आरोप रिजिजू यांनी फेटाळून लावला. ...

April 3, 2025 8:18 PM April 3, 2025 8:18 PM

views 17

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणल्याचं अल्पसंख्यक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं. वक्फच्या मालमत्तेत मुस्लिमेतर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही, याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल, असं रिजीजू यांनी स्पष्ट  केलं. या विधेयकाचा हेतू वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं असून मुस्लिमांच्या  धार्माचरणात हस्तक्षेप करण्याचा नाही असंही त्यांनी सांगितलं.    वक्फ सुधारणा विधेयक आणून सरकार समाजात विभाजन कर...