June 30, 2025 3:18 PM June 30, 2025 3:18 PM

views 3

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्या.   दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यानंतर त्यांनी त...