August 6, 2024 3:03 PM

views 20

‘देशात आतापर्यंत १ कोटी ९२ लाख सीम कार्डांची सेवा खंडित करण्यात आली’

सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या उद्देशानं देशभरात आतापर्यंत १ कोटी ९२ लाख सीम कार्डांची सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती आज राज्यसभेत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. सायबर घोटाळा प्रकरणात सरकार शून्य सहिष्णूता धोरण अमलात आणत असल्याचं त्यांनी सांगितलं.

July 26, 2024 8:23 PM

views 20

राज्यसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

राज्यसभेचं कामकाज आज केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ वरच्या चर्चेनं सुरु झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केवळ अल्पकालीन लोनानुनयी निर्णय घेतले नसून मध्यम आणि दीर्घकालीन विचारांवर काम केल्याचं वायएसआरसीपीचे एस. निरंजन रेड्डी यांनी सांगितलं. तर, हा अर्थसंकल्प लोकविरोधी आणि संघराज्य विरोधी असल्याचा आरोप सीपीआयचे सदस्य पी संतोष कुमार यांनी केला. राजदचे ए डी सिंह यांनी देशातल्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला, आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडे योग्य लक्ष पुरवण्यात आलं नसल...

July 25, 2024 8:18 PM

views 26

राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधकांची सरकारवर टीका

राज्यसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधकांनी सरकारवर टीका केली. काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी शेतकरी, गरीब आणि बेरोजगारी हे मुद्दे उपस्थित केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नसून, सरकार अन्नधान्यावर पुरेसं किमान आधारभूत मूल्य देत नसल्याचं ते म्हणाले.   सरकारनं या अर्थसंकल्पातून समाजाच्या कोणत्याही घटकाचं समाधान केलं नसल्याची टीका ‘आप’ चे राघव चड्डा यांनी केला. सामान्य माणसावरचा कराचा बोजा वाढला असून ग्रामीण भागातली उत्पन्नाची वाढ दशकभरात सर्वात नीचांक...