December 10, 2024 1:51 PM December 10, 2024 1:51 PM
8
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवर गदारोळ होऊन आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वागणुकीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. सभागृहाच्या सभ्यतेचे पालन केलं जावं,तसंच देशातल्या जनतेच्या आशाआकांक्षांचा आदर राखत काम केलं जावं, असं आवाहन त्यांनी विरोधी नेत्यांना केलं. राज्यसभेतही असंच चित्र दिसून आलं. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला....