July 4, 2025 8:42 PM July 4, 2025 8:42 PM
11
उद्धव आणि राज ठाकरे पक्षाचा संयुक्तपणे विजयी मेळावा
राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या संयुक्तपणे विजयी मेळावा घेणार आहेत. दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत समाज माध्यमावर याविषयी माहिती दिली होती. मुंबईत वरळी इथं आयेजित या विजयी मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषकांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन संयुक्तरित्या करण्यात आलं आहे.