March 3, 2025 7:26 PM March 3, 2025 7:26 PM

views 17

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. हा पुतळा ८३ फूट उंच असेल. हा पुतळा वर्षानुवर्षे टिकेल असा विश्वास शिल्पकार अनिल सुतार यांनी व्यक्त केला. एका महिन्यात पुतळ्याचं काम पूर्ण होईल.

August 28, 2024 3:29 PM August 28, 2024 3:29 PM

views 10

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या निषेध मोर्चादरम्यान तणाव

मालवण राजकोट इथं कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज तिथं गेलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस आणि एक महिला  असे दोघे जखमी झाले.  आज महाविकास आघाडीनं मालवण बंदची हाक दिली होती, त्याला मालवण मध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मालवणची पूर्ण बाजारपेठ आज बंद होती. महाविकास आघाडीचा मोर्चाला सकाळी सुरु झाला. या मोर्च्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे, तसंच आदित्य ठाकरे, जयंत पाटील ...