August 20, 2025 3:13 PM August 20, 2025 3:13 PM
7
माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त आदरांजली
माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत वीरभूमी इथं राजीव गांधी यांच्या समाधीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पांजली वाहिली. संसदेच्या केंद्रीय सभागृहातही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह इतर सदस्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. मुंबईत राजभवनात देखील राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून त्यांना अभ...