August 29, 2025 3:28 PM August 29, 2025 3:28 PM

views 6

राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ

राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्य सचिवांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्र सरकारला पाठविला होता. या प्रस्तावाला केंद्रानं मान्यता दिली.   यामुळे राजेश कुमार यांना  १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ असा वाढीव काळ मिळणार आहे. नियमित वेळापत्रकानुसार ऑगस्ट अखेरीस ते सेवानिवृत्त होणार होते. १९८८ बॅचचे सनदी अधिकारी असणाऱ्या राजेश कुमार यांनी ३० जून २०२५ रोजी राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली होती.

June 30, 2025 3:27 PM June 30, 2025 3:27 PM

views 72

राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती

वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजेश कुमार सध्या महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसच वनविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत असून  कुमार यांची  नियुक्ती करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.