December 1, 2024 3:04 PM December 1, 2024 3:04 PM

views 14

जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी विधेयकाच्या मसुद्याला राजस्थान मंत्रिमंडळाची मंजुरी

जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी विधेयकाच्या मसुद्याला राजस्थान मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून 'राजस्थान बेकायदेशीर धर्मांतर बंदी विधेयक २०२४' या नावाचं हे विधेयक आता राजस्थान विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडलं जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचं असेल तर, त्या व्यक्तीला ६० दिवस अगोदर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज द्यावा लागेल, असा प्रस्ताव या विधेयकात असल्याची माहिती राज्याचे संसदीय कामकाज मंत्री जोगाराम पटेल यांनी दिली आहे. धर्मांतर सक्तीने किंवा कोणत्याही प्रल...

October 24, 2024 1:38 PM October 24, 2024 1:38 PM

views 14

राजस्थान आणि उत्तरप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर

राजस्थान आणि उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राजस्थामधल्या चौरासी विधानसभा मतदारसंघासाठी तर उत्तर प्रदेशमध्ये कुंदरकी, गाझियाबाद, खैर, करहल, फुलपूर, कटेहरी आणि मझवा या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.

October 20, 2024 1:30 PM October 20, 2024 1:30 PM

views 13

राजस्थानमधल्या धौलपूर इथं राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

राजस्थानमधल्या धौलपूर इथं राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांची संख्या अधिक आहे. लग्नसमारंभाहून परत येत असताना बस आणि रिक्षा एकमेकांवर धडकल्यामुळे हा अपघात झाला. बस चालक आणि वाहक दोघांची स्थिती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

August 12, 2024 10:26 AM August 12, 2024 10:26 AM

views 10

राजस्थानात मुसळधार पावसामुळे २० जणांचा मृत्यू

राजस्थानच्या अनेक भागात शनिवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या २४ तासात राजस्थानच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून; त्या पार्श्वभूमीवर जयपूर शहर आणि ग्रामीण भाग, सवाई माधोपुर, दाऊसा, करौली, गंगापुर आणि भारतपूर या जिल्ह्यात; प्रशासनाने सर्व खाजगी आणि सरकारी शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.