November 3, 2025 8:32 PM November 3, 2025 8:32 PM

views 19

रस्ते अपघातात तेलंगणामध्ये १९, तर राजस्थानमधे १४ जणांचा मृत्यू

तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्लाजवळच्या मिर्जागुडा-खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद-हैदराबाद मार्गावर एका ट्रकनं एका दुचाकीच्या मागून पुढं जाण्याचा प्रयत्न करताना आरटीसी बसला धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.   अपघाताची माहिती मिळण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं हैदराबादमध्ये एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. विशेष वैद्यकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत.    राष्ट्रपती, उपराष्ट्रप...

November 3, 2025 10:06 AM November 3, 2025 10:06 AM

views 26

राजस्थानमध्ये रस्ते अपघातात १५ हून अधिक जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये, फलोदी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 15 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. जोधपूरमधून यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस, एका थांबलेल्या ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून, जखमींच्या योग्य उपचाराची दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना दोन लाख तर जखमींना 50 हजार रुप...

October 15, 2025 1:33 PM October 15, 2025 1:33 PM

views 43

राजस्थानमध्ये झालेल्या बस अपघातात मृतांची संख्या २०

राजस्थानमध्ये जैसलमेरजवळ काल एका वातानुकूलित बसला आग लागून झालेल्या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला तर १५ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी अनेकजण ७० टक्क्यांपर्यंत गंभीर भाजले आहेत.   शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली असून जखमींना उपचारासाठी जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून केंद्र सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखम...

October 14, 2025 8:13 PM October 14, 2025 8:13 PM

views 18

राजस्थानमध्ये बसला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, १४ जखमी

राजस्थानमध्ये जोधपूर महामार्गावर एका खासगी बसला लागलेल्या आगीत किमान १० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती आहे, तर १४ पेक्षा जास्त जण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींवर जोधपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि घटनास्थळाला भेट दिली. उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. 

October 13, 2025 10:30 AM October 13, 2025 10:30 AM

views 37

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानच्या एका दिवसाच्या भेटीवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानच्या एका दिवसाच्या भेटीवर जयपूर इथं जाणार आहेत. तीन नवीन फौजदारी कायदे लागू होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे, त्यानिमित्त जयपूरमध्ये राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्याचं उद्घाटन अमित शहा करणार आहेत   आजपासून सुरू होणाऱ्या 6 दिवसांच्या या प्रदर्शनात या तीन फौजदारी कायदयांमधील तरतूद आणि राजस्थानमध्ये त्यांची झालेली अंमलबजावणी दर्शवण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर शहा जनतेला संबोधित करतील. रायझिंग राजस्थान ग्लोबल इनव्हेस्टमेंट समिट 2024 अंतर्गत म...

April 8, 2025 7:46 PM April 8, 2025 7:46 PM

views 17

जयपूरात १७ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी स्फोट प्रकरणी दोषींना जन्मठेप

राजस्थानात जयपूर इथे १७ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी स्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या चार दहशतवाद्यांना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी ४ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत या चारही दहशतवाद्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. दहशतवाद हा समाजासाठी धोका असून अशा गुन्हेगारांना कोणतीही दया दाखवता येणार नाही, असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. जयपूरमधे १३ मे २००८ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता तर १८५ जण जखमी झाले होते. 

February 15, 2025 7:09 PM February 15, 2025 7:09 PM

views 15

गुजरात आणि राजस्थानमधल्या १४ पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधीत आढावा बैठक

उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने आज गुजरात आणि राजस्थानमधल्या १४ पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत या प्रकल्पांना अडथळे ठरत असलेल्या सुमारे २१ समस्यांचा आढावा घेतला घेतला गेला. उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अमरदीप भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्प प्रस्तावक उपस्थित होते. प्रकल्प देखरेख गटाच्या माध्यमातून विविध मंत्रालये आणि राज्यसरकारमधला समन्वय वाढ...

December 29, 2024 7:43 PM December 29, 2024 7:43 PM

views 14

पंजाब हरयाणा आणि राजस्थानमध्ये येत्या दोन-तीन दिवसात दाट धुक्याचा हवामान विभागाचा अंदाज

पंजाब हरयाणा आणि राजस्थानमध्ये येते दोन ते तीन दिवस दाट ते अतिदाट धुक्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात तसंच चंदीगढमध्येही थंडीची लाट असेल. हिमाचल, उत्तरप्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणीपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही रात्री उशीरा ते पहाटेपर्यंत धुके असेल. येत्या तीनचार दिवस उत्तर प्रदेशात किमान तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसने तर पंजाब ,हरयाणा, दिल्ली, राजस्थानमध्ये ते तीन ते चार अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालय प्रदेशात बर्फवृष्टीची शक्यता आहे.

December 17, 2024 1:50 PM December 17, 2024 1:50 PM

views 17

राजस्थानात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ४६,३०० कोटी रुपये खर्चाच्या २४ प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

गेल्या वर्षभरात राजस्थानात झालेली प्रगती ही भविष्यातल्या अनेक वर्षातल्या प्रगतीची मुहूर्तमेढ ठरली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर जयपूर इथे आयोजित एक वर्ष परिणाम उत्कर्ष या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी मोदी यांनी ४६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणीपुरवठा या क्षेत्रातल्या २४ प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं.

December 17, 2024 9:46 AM December 17, 2024 9:46 AM

views 15

राजस्थान सरकार स्थापनेच्या वर्षपुर्तीनिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ४६,००० कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट

राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जयपूरमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ४६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या उर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी या क्षेत्रातील २४ प्रकल्प पायाभरणी आणि उद्घटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि काही केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पांमध्ये पूगलमध्ये २ हजार मेगावॅट क्षमतेचा सौर पार्क आणि १ हजार...