May 6, 2025 3:04 PM May 6, 2025 3:04 PM

views 12

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. सामाजिक समता प्रस्थापित करणारे, बहुजनांचे तारणहार असलेले शाहू महाराज यांच्या महान विचार आणि कार्याला शतश: प्रणाम, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना म्हटलं आहे सामाजिक परिवर्तनाला गती देत समाज विकासात शाहू महाराजाचं योगदान अमूल्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांना अभिवादन करतांना म्हंटलं आहे.

June 26, 2024 1:40 PM June 26, 2024 1:40 PM

views 12

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या १५०व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशेपन्नासाव्या जयंती दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन इथं  छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनीही  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना समाजमाध्यमांवर आदरांजली वाहिली आहे.   कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्...