September 27, 2024 3:08 PM September 27, 2024 3:08 PM

views 39

माजी आमदार राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजन पाटील यांची नियुक्ती झाली आहे. राज्य शासनानं त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.  सहकार विभागानं याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला. आजपासून तीन वर्ष, किंवा पुढचा आदेश येईपर्यंत राजन पाटील या पदावर राहतील, असं शासन निर्णयात म्हटलं आहे.