December 8, 2024 7:14 PM December 8, 2024 7:14 PM

views 47

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प संगमनेर मार्गावरच होणार

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा जुन्याच प्रस्तावित संगमनेर मार्गावरच होणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. हा प्रलंबित प्रकल्प प्रस्तावित संगमनेर मार्गावरच व्हावा या मागणीसाठी  खासदार राजाभाऊ वाजे यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिल्याचं वाजे यांनी सांगितलं. महारेलनं या प्रकल्पासाठी आखलेल्या आराखड्यात, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील ठिकाणी रेल्वे मार्ग प्रस्तावित होता. वेळोवेळी पाठपुरावा करून ही बाब आपण ही...