January 22, 2026 2:45 PM

views 14

ख्यातनाम ढोलकीवादक राजाभाऊ जामसंडेकर यांचं मुंबईत निधन

जागतिक कीर्तीचे ख्यातनाम ढोलकीवादक राजाभाऊ जामसंडेकर यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. उस्ताद झाकिर हुसेन, पंडित भवानी शंकर यांसारख्या कलाकारांसोबत जुगलबंदी वादन करणाऱ्या राजाभाऊंनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक संगीतकारांसोबतही काम केलं. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात ते प्रदीर्घ काळ ढोलकीवादक म्हणून जोडलेले होते.