August 24, 2024 8:10 PM August 24, 2024 8:10 PM
2
विधानसभा निवडणुकीत मनसे २५० जागा लढवणार
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २५० जागा लढवणार असल्याचं पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. नागपुरातील रवि भवन इथं आज, ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जनता आपल्यासोबत असून मनसेला निवडणुकीत चांगले यश मिळेल असा दावा ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठीची आपली धोरणं त्यांनी स्पष्ट केली. राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहिण योजना औटघटकेची ठरेल. राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्याने ही योजना 2 महिन्यात गुंडाळली जाईल असं भाकित त्यांनी वर्तवलं.