October 16, 2024 3:43 PM October 16, 2024 3:43 PM
9
एनएसजीच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा
एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या संरक्षणाप्रति एनएसजी जवानांचं समर्पण, धैर्य आणि निर्धार यामुळे देश त्यांना सलाम करत आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. एनएसजी ज्या निष्ठेने देशाच्या संरक्षणासाठी झटते ते प्रशंसनीय आहे. असंही त्यांनी नमूद केलं आहे.