March 18, 2025 3:54 PM March 18, 2025 3:54 PM

views 7

अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी प्रधानमंत्र्याचे मानले आभार

नवी दिल्लीत सुरू असलेल्या रायसिना संवाद कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल अमेरिकाच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. भारत भेटीत विविध विषयांवर ठोस आणि सकारात्मक चर्चा झाल्याचंही गबार्ड यांनी रायसिना संवाद कार्यक्रमात सांगितलं. गेल्या महिन्यात वॉशिग्टन डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया इथं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर भारतीय अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठका सकारात्मक झाल्याचं गबार्ड यांनी सांगितलं. 

March 17, 2025 8:25 PM March 17, 2025 8:25 PM

views 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ख्रिस्तोफर लक्झन यांच्या हस्ते रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन

भारत आणि न्युझीलंडच्या आर्थिक प्रगतिकरता दोन्ही देशांनी एकमेकांशी तंत्रज्ञानाची देवाण घेवाण करणं गरजेचं असल्याचं मत न्यू झिलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्सन यांनी केलं आहे. रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ख्रिस्तोफर लक्झन यांच्या हस्ते झालं. त्यानंतर ते बोलत होते.गेल्या २०० वर्षांपासून भारत आणि न्युझीलंडचे नागरिक उद्योग आणि संस्कृतीची आदान प्रदान करत आहेत, आणि आजही विविध क्षेत्रात सहकार्य वृद्धीसाठी दोन्ही देश कार्यरत असल्याचं लक्झन यावेळी म्हणाले. औषध...

March 16, 2025 6:29 PM March 16, 2025 6:29 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन करणार आहेत. या संवादाचं हे दहावं वर्ष आहे. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झन हे या संवादाच्या उद्घाटनाच्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि उपस्थितांशी संवाद साधतील. उद्यापासून १९ तारखेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. यंदा रायसीना संवादाची मध्यवर्ती संकल्पना ‘कालचक्र - नागरिक, शांतता आणि पृथ्वी’ अशी आहे. यंदा या कार्यक्रमात १२५ देशांमधून विविध क्षेत्रांमधले आघाडीचे नागरिक सहभागी होणार आहेत. यासाठी वि...