August 3, 2025 12:46 PM

views 12

उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि उत्तराखंडमध्ये दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून ; मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, लक्षद्वीप, रायलसीमा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या ईशान्य भारतातील काही भागातही अशीच परिस्थिती अपेक्षित आहे.   नवी दिल्ली एनसीआरमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ...

August 3, 2024 1:22 PM

views 21

मुंबई मध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. उपनगरी रेल्वे गाड्या नियमित वेळेत धावत आहेत.   मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला हवामान विभागानं आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.   दरम्यान, हवामान विभागानं सातारा जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.   

June 29, 2024 10:34 AM

views 24

देशात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू

नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली याराज्यांमधे मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल,झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडचा भाग आणि उत्तराखंडच्या काही भागातहीमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.   कोकण, मध्य महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह अन्य काही राज्यात मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. गुजरात,कर्नाटकची किनारपट्टी तसंच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येही काही ...