December 4, 2024 8:31 AM December 4, 2024 8:31 AM

views 16

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी; आजही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

राज्यात काल सर्वत्र अंशतः ढगाळ हवामान होतं. सोलापूरसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडल्याची नोंद आहे. आज कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर विदर्भात हवामान कोरडं राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे.

July 27, 2024 10:54 AM July 27, 2024 10:54 AM

views 17

मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून भारतीय हवामान विभागानं मुंबईसाठी दक्षतेचा पिवळा बावटा दाखवला आहे. मुंबईमध्ये काल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागानं मुंबईसह पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील पिवळा बावटा तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी नारंगी बावटा जारी केला आहे.

July 25, 2024 7:22 PM July 25, 2024 7:22 PM

views 9

मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे, प्रशासनाचा निर्णय

जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये ६६ टक्क्यापेक्षा जास्त भर पडली आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईत सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात येत्या २९ जुलै पासून मागे घेण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे.

July 16, 2024 12:48 PM July 16, 2024 12:48 PM

views 8

राज्यात खरीपाच्या पेरण्यांना वेग

राज्यातही समाधानकारक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.नाशिक जिल्ह्यात खरीपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीपाचं क्षेत्र 6 लाख 41 हजार हेक्टर आहे; त्यापैकी 4 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं जिल्ह्यात सर्वत्र भात रोपणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.