August 18, 2025 8:33 PM August 18, 2025 8:33 PM

views 1

राज्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती

राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडला. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागांना रेड अलर्ट तर, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. समुद्र खवळलेला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा ...