July 16, 2024 1:12 PM

views 18

राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून, राज्यात पुढील पाच दिवस किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.   राज्याच्या अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. २० जिल्ह्यांमधल्या साडे आठ लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. नाशिकमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मराठवाड्यातल्या बहुतांश भागात गेल्या ४८ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.   छत्रपती संभाजीन...

July 15, 2024 6:55 PM

views 12

राज्यात आठवडाभर कमी आधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात हा आठवडाभर कमी आधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात राज्यातल्या सर्व विभागांमधे बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तरळक ठिकाणी अतिशय जोरदार,  मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.  उद्याही राज्यातल्या चारही विभागांमधे बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.  या काळात मुंबई शहर आणि उपनगरात मध्य...

July 15, 2024 7:44 PM

views 6

मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा

मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे स्थानकांदरम्यान काल कोसळलेली दरड काढण्यात जवळपास २४ तासांनी यश आलं आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावरची वाहतूक सुरू होईल. तसंच रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली रस्ते वाहतूकही सुरळीत झाली आ...

July 14, 2024 7:15 PM

views 18

मुंबईसह कोकणात पावसाची संततधार

राज्यात आजही अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई ठाण्यासह उपनगरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.  मुंबईत दादर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांदरम्यान झाड पडल्यामुळं पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ विस्कळीत झाली, मात्र ती लगेचच पूर्ववत झाली. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आल्याची स्थिती आहे. भिवंडीत बाजारपेठ, तीन बत्ती, कल्याण नाका या परिसरात गुडघाभर पाणी साचलं. रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झालं. जिल्ह्या...

July 8, 2024 10:58 AM

views 12

महिला क्रिकेट : भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवरचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तत्पूर्वी, फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावत 177 धावा केल्या होत्या. तझमिन ब्रिट्सने सर्वाधिक 52 धावा 39 चेंडूत केल्या, तर एनेक बॉशने 32 चेंडूत 40 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी 2, तर श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.   मात्र, खेळाच्या विश्रांतीदरम्यान मुसळधार पाऊस झा...

June 27, 2024 11:49 AM

views 22

येत्या २४ तासात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

येत्या २४ तासात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे