August 18, 2024 1:17 PM August 18, 2024 1:17 PM

views 10

येत्या दोन ते तीन दिवसांत देशाच्या ईशान्येकडल्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन ते तीन दिवसांत देशाच्या ईशान्येकडल्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे.  बांगलादेशाच्या दक्षिण भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हे क्षेत्र उत्तर तसंच वायव्य दिशेला जाण्याची शक्यता असून त्यामुळे पश्चिम बंगालच्या  गांगे भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल. यामुळे ओदिसा, झारखंड, बिहार, सिक्किम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरात मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच केरळ, तामिळना...

August 17, 2024 3:56 PM August 17, 2024 3:56 PM

views 6

मराठवााड्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

मराठवााड्यात काल अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.   बीड जिल्ह्यातल्या पाटोदा महसूल मंडळात काल मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस पडत असून मांजरा नदीला महापूर आला आहे. पाटोदा, पारगाव, अनपटवाडी या नदीकाठच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसला असून शेकडो एकर जमिनीवरची पिकं पाण्याखाली गेली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   हिंगोली जिल्ह्यातल्या तीसपैकी नऊ मंडळात गेल्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली असून, काल पहाटे मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळं हिंगोली शहरालगत असलेल्या कया...

August 15, 2024 6:35 PM August 15, 2024 6:35 PM

views 13

येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज आहे.

August 12, 2024 3:16 PM August 12, 2024 3:16 PM

views 13

राज्यात पावसाची विश्रांती

राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रांमध्येही चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या विदर्भातल्या सहा मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या उर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा, नागपूर जिल्ह्यातल्या पेंच तोतलाडोह, गोंदिया जिल्ह्यातल्या इटियाडोह, भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द, आणि वर्धा जिल्ह्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पांचा समावेश आहे. वैनगंगा...

August 7, 2024 7:45 PM August 7, 2024 7:45 PM

जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून १५ टीएमसी पाणी सोडलं

नाशिक जिल्ह्यात चार दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातली सहा धरणं भरली आहेत तर आणखी सहा धरणांमध्ये ८० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत पंधरा टीएमसी पाणी सोडल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं.   गेल्या २४ तासात पावसाने विश्रांती घेतली आहे. पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुद्धा सध्या पाऊस थांबला आहे. पावसामुळे धरणातला पाणीसाठा वाढला असून गंगापूर, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी आणि केळझर या धरणामध्ये अद्य...

August 2, 2024 5:52 PM August 2, 2024 5:52 PM

views 16

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध

वाशिम जिल्ह्यात पावसानं  सरासरी ओलांडली असली तरी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये मात्र पाण्याचा साठा वाढलेला नाही. या प्रकल्पात केवळ पस्तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या प्रकल्पातला जलसाठा वाढला नसल्याने वाशिमकरांमध्ये चिंता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी जपून वापरावं अशा सूचना पालिकेनं दिल्या आहेत.

August 2, 2024 7:31 PM August 2, 2024 7:31 PM

जोरदार पावसामुळे नंद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणच्या नद्या आणि तलाव भरून वाहत आहेत.   सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं वारणा आणि कोयना धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या ५ हजारहून अधिक जणांना पशुधनासह सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. सांगलीत आयर्विन पुल आणि मिरज या दोन्ही ठिकाणी कृष्णा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं प्रशासनानं आवाहन केल आहे.   गोंदिया जिल्ह्...

July 31, 2024 3:29 PM July 31, 2024 3:29 PM

views 5

पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं, दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.

July 16, 2024 8:11 PM July 16, 2024 8:11 PM

views 4

पुढचे पाच दिवस मध्य महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि केरळात मुसळधार पावसाची शक्यता

पुढचे पाच दिवस गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.    तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि तामिळनाडू इथंही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, जम्मू, काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये पुढच्या पाच दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्...

July 16, 2024 7:25 PM July 16, 2024 7:25 PM

views 17

येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे पाऊस

गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.  येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  येत्या २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस पडेल, तर संध्याकाळी किंवा रात्री काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची ...