September 9, 2024 7:06 PM

views 21

गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण, आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.    हवामान विभागानं मुसळधार पावसामुळं गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट दिला आहे. ...

September 9, 2024 3:44 PM

views 18

राज्याच्या अनेक भागात अद्याप पावसाचा जोर

राज्यात अनेक ठिकाणी अजूनही पावसाचा जोर आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्यानं पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं काही कुटुंबांना निवारागृहात हलवलं आहे. पुरामुळे भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक बंद आहे. मुलचेरा तालुक्यातही दिना नदीला पूर आल्यानं मुलचेरा-आष्टी मार्गही बंद असल्याची माहिती प्रशासनानं दिली. गेल्या चोवीस तासांत भामरागड तालुक्यात १६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पात ९७ टक्क्याहून जास्त पाणीसाठा...

August 27, 2024 1:37 PM

views 18

गुजरातमध्ये गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

गुजरातमध्ये गेले दोन दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि नवसारीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे ५०० रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. सखल भागातल्या सुमारे १७ हजार रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राज्यातली ५० हून अधिक धरणं भरून वाहत आहेत. आणंद मार्गे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्...

August 25, 2024 10:45 AM

views 12

मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

मराठवाड्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात काल दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव आडुळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे पैठण तालुक्यातल्या कडेठाण इथल्या मजरदरा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली. जगप्रसिद्ध वेरूळ इथला सिता न्हाणी धबधबा पाहण्यासाठी काल पर्यटकांनी गर्दी केली होती. या मार्गावर काही काळ वहातूक कोंडी झाली होती. बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातल्या पाली, नलावंडी पाटोदा, लिंबागणेश तसंच पाटोदा गेवराई, माजलगाव, केज...

August 24, 2024 7:37 PM

views 13

येत्या २४ तासांत रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता

येत्या २४ तासांत रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसह कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, धुळे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरीत महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.  रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी कर...

August 24, 2024 7:30 PM

views 76

राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय

राज्यातल्या बहुतांश भागात आज पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे एसटी बस अडकून पडल्या आहेत. दरम्यान कर्ली आणि तेरेखोल नदी इशारा पातळी जवळून वाहत होत्या.  जालना शहरासह घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा, कंडारी, आंतरवाली टेंभी, रामसगाव, शेवता, बानेगाव या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.  धुळ्यात निम्न पांझरा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदीपात्रासह ...

August 23, 2024 7:18 PM

views 29

धुळे जिल्ह्याला आज रेड अलर्ट

धुळे जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला. पावसामुळे धुळे आणि साक्री तालुक्यातल्या जल प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.  मालनगांव, पांझरा, जामखेली प्रकल्प भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अक्कलपाडा धरणातून आज दुपारी २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला असून नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  जालना जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. भोकरदन तालुक्यात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पद्मावती धरणाच्...

August 22, 2024 6:04 PM

views 18

देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पावसाचा अंदाज

देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढले ७ दिवस दक्षिण द्वीपकल्पात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,आणि गुजरातमध्ये येत्या २६ ऑगस्ट पर्यंत,  तर  आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढले ५ दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.

August 20, 2024 7:53 PM

views 15

त्रिपुरा : भूस्खलन आणि महापुराच्या घटनांमधे ७ जणांचा मृत्यू

त्रिपुरामधे मुसळधार पावसामुळं गेल्या दोन दिवसांत झालेल्या भूस्खलन  आणि महापुराच्या घटनांमधे किमान सात नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. संततधार पावसामुळं तिथलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. तिथला  अतिसखल भाग पिकांसह पाण्यात बुडाला आहे. हावडा, गोमती, खोवई तसंच मुहुरी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं या नद्यांकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे.  आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी त्रिपुरा राज्य सरकारनं राज्यभरात १८३ निवारा छावण्या उभारल्या असून तिथली जिल्हा प्रशासनं पुरग्रस्त नागरिकांना अहोरात्र म...

August 19, 2024 11:14 AM

views 10

पश्चिमबंगाल, ईशान्येकडील राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बिहार, छत्तीसगड आणि दक्षिण द्वीपकल्प परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ. नरेशकुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.