December 5, 2024 7:13 PM December 5, 2024 7:13 PM

राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज मात्र पावसानं हजेरी लावल्यानं पुन्हा गारवा वाढला आहे. थंडीतला पाऊस आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यानी केलं आहे.  सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथंही आज संध्याकाळी  जोरदार पाऊस झाला. 

December 3, 2024 7:42 PM December 3, 2024 7:42 PM

views 9

येत्या दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता

फेंजल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातल्या वातावरणावरही दिसून येत आहे. पुढच्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.

October 22, 2024 7:22 PM October 22, 2024 7:22 PM

views 18

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात जोरदार पाऊस

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात आज जोरदार पाऊस झाला. कडा परिसरात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. काही ठिकाणी शेतातल्या गोठ्यात पाणी शिरल्याने साठवलेलं धान्य आणि इतर साहित्याचं नुकसान झालं. तसंच एका मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिराचं नुकसान झालं आहे. आष्टी तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लघु आणि मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.

October 20, 2024 10:35 AM October 20, 2024 10:35 AM

views 11

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसंच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

October 16, 2024 3:50 PM October 16, 2024 3:50 PM

नैऋत्य मान्सूनची देशभरातून माघार

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा भारतीय उपखंडावरुन परतीचा प्रवास काल पूर्ण झाला, त्याचवेळी ईशान्य मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात चेन्नईपासून सुमारे ४९० किलोमीटर अंतरावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आज पुद्दुचेरी आणि नेल्लोर दरम्यान उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आणि येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.   चेन्नई, कुड्डालोर, एन्नोर, कट्टुपल्ली आणि पुद्दुचेरी इथ...

October 15, 2024 10:32 AM October 15, 2024 10:32 AM

views 14

राज्यात येत्या 24 तासात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या 24 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सांगली जिल्ह्यात तसंच रत्नागिरीमध्येही काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे शहराच्या काही भागातही काल रात्री पावसाच्या जोरदार सरी आल्या. बुलडाणा जिल्ह्याला नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक गावांत पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

September 27, 2024 7:24 PM September 27, 2024 7:24 PM

views 6

राज्यातल्या विविध धरणांमधे ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

राज्यातल्या विविध धरणांमधे सध्या ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. मुंबईच्या अनेक भागांत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानं आज मुंबई, पालघर, रायगड आणि उत्तर महाराष्ट्र या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबई परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातही आज जोरदार पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागानं कळवलं आहे.    नाशिक मधल्या धरणांमधला पाणीसाठा वाढला असून गंगापूर धरणासह १३ धरणांमधून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या पाव...

September 26, 2024 3:18 PM September 26, 2024 3:18 PM

views 8

महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान

मुंबईसह अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसाने थैमान घातलं. मुंबईतले अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पाऊस आणि वादळामुळे विमानतळावरची १६ उड्डाणं वळवण्यात आली. तसंच, अनेक रेल्वेगाड्याही थांबवाव्या लागल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर झाली आहे.   राज्यात गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी तर ३ जण बेपत्ता आहेत. मुंबईत अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश म...

September 23, 2024 7:28 PM September 23, 2024 7:28 PM

views 13

मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांत जोरदार पावसाची हजेरी

राज्यात कालपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून येत आहेत. रत्नागिरीत आज  दुपारपासून मळभ होतं मात्र संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली.  सांगली जिल्ह्यात तासगाव, पलूस, मिरज, कवठेमहांकाळ आणि वाळवा तालुक्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. अहमदनगर शहरातही संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.   येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी साेसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात ...

September 21, 2024 7:36 PM September 21, 2024 7:36 PM

views 8

देशातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या सोमवारपासून सुरु होण्याची शक्यता

देशातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या सोमवारपासून सुरु होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवली आहे.  धाराशिवमध्ये कळंब तालुक्यात भाटशिरपूरा इथं वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. परतीच्या पावसानं नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये सोयाबीन काढणीच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला. सांगलीत संध्याकाळी मिरज, तासगाव, कवठेमहाकाळ, पलूस या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली.  येत्या दोन दिवसांत कोकण, मध...