May 14, 2025 12:40 PM May 14, 2025 12:40 PM

views 9

राज्यात विविध ठिकाणी हलका पाऊस झाल्यानं तापमानात घट

मुंबई , ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये काल दिवसभर ढगाळ हवामान होतं. काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाल्यानं तापमानात घट झाली. मुंबईच्या साकीनाका परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. येत्या चार- पाच दिवसांत मुंबई शहर आणि आसपास ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठाणे , रायगड जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. इथे येत्या शुक्रवारपर्यंत गडगडाटासह विजा चमकण्याचा तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वेगवान वारे वाहण्याचा अंदाज व्य...

May 12, 2025 11:46 AM May 12, 2025 11:46 AM

views 12

देशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

देशात पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी हवामान विभागानं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम मेघालय आणि पंजाबमध्ये गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता आहे.   मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या सात दिवसांत मध्य भारतात कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे.

May 10, 2025 12:55 PM May 10, 2025 12:55 PM

views 11

देशात ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

देशाच्या वायव्य, मध्य आणि पूर्व भागात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून, ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशात आज, तर आसाम, मेघालय, मणिपूर, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या पर्वत रांगांमध्ये उद्या जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.  येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात कमाल तापमानात टप्प्याटप्प्याने दोन ते चार अंश सेल्सिअस वाढ होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

May 9, 2025 7:46 PM May 9, 2025 7:46 PM

views 7

महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस

गेल्या चोवीस तासात, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. कोकणात काही ठिकाणी किंचित घट झाली.  राज्याच्या चारही विभागांमध्ये आठवडाभर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. पुढचे चार दिवस तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

April 11, 2025 9:41 AM April 11, 2025 9:41 AM

views 10

बिहारमध्ये पावसामुळे २८ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये काल अनेक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाल्याच वृत्त आहे. राज्यातील नालंदा , जहानाबाद, मुज्जफरपूर, आरारिया आणि बेगुसराई या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. नालंदा जिल्ह्यात पावसामुळे सर्वात जास्त 18 जणांचा मृत्यू झाला असून, बिहार शरीफ इथ एका मंदिराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले .   इस्लामपूर , सिलाओ, राहुई , गरियक इथही वीज अंगावर कोसळून झालेल...

April 5, 2025 8:46 AM April 5, 2025 8:46 AM

views 15

राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

April 3, 2025 3:34 PM April 3, 2025 3:34 PM

views 11

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

राज्यातल्या अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी वीजांसह सुमारे तासभराहून अधिक काळ जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला असला, तरी आंबा-काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसानकारक ठरणार आहे.    धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नेर गावासह परिसरात गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.   नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावात गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वारे आणि पावसामुळं काढणीस आलेल्या आणि शेतात काढून ठेवलेल्या...

March 17, 2025 8:05 PM March 17, 2025 8:05 PM

views 6

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भात काही ठिकाणी काल उष्णतेची लाट होती. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर राज्यात इतर ठिकाणी ते काहीसं वाढलं होतं. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

February 20, 2025 1:38 PM February 20, 2025 1:38 PM

छत्तीसगडच्या काही भागात आज सकाळी जोरदार पाऊस

छत्तीसगडच्या काही भागात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानं राज्यातल्या काही भागात गारपीटीचा इशाराही दिला आहे. रांची, खुंटी, सिमडेगा, पूर्व सिंघभूम, सेराईकेला खारवास या भागात वीजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. 

December 6, 2024 7:41 PM December 6, 2024 7:41 PM

views 6

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

वाशीम जिल्ह्यात काही दिवसापासून ढगाळ वातावरण असून आज दुपारी बारा वाजता मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा या तीन तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसानं मंगरूळपिर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन भिजलं. सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभाव मिळत असल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. मराठवाड्यात आज सर्वत्र पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून ढगाळ वातावरण असून, मध्य...